इतिहास विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे.

Certificate Course

मोडी लिपी (Modi Script) प्रमाणपत्र अभ्यासक्रम
आजीवन अद्ययन व विस्तार विभाग ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 Add-on Course: Modi Script

            To promote a multidisciplinary approach, a Certificate course entitled ‘Modi Script’ was introduced in the Department of History in collaboration with the Department of Lifelong Learning and Extension, Shivaji University, Kolhapur. During the assessment period five batches successfully completed the said course. 

   

 महाराष्ट्राच्या इतिहासात मोडी लिपीला अन्यनसाधरण महत्त्व आहे. बहुतांशी ऐतिहासिक दस्तावेज हे मोडी लिपीमध्ये आहेत. साधारण 1950 च्या दशकात महाराष्ट्र सरकारने मोडी लिपीचा वापर अधिकृतरित्या बंद केला. सरकारी राजाश्रय बंद झाल्याने या लिपीचे शिक्षण पुढील पिढीला मिळणे बंद झाले. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी तिचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन या लिपीचे पुनरुज्जिवन व्हावे, तिचा जास्तीत जास्त पसार होऊन ऐतिहासिक संशोधनाला चालना देण्यासाठी आजीवन अद्ययन व विस्तार विभाग ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाविद्यालाच्या इतिहास विभागामार्फत एक महिना कालावधीचा मोडी लिपीप्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरूकरण्यात आला आहे.

मोडी लिपी अभ्यासक्रम उद्देश:- 

1. मोडी लिपीमधील कागदपत्रे वाचण्याची आणि समजण्याची क्षमता प्राप्त करून देणे. 

2. मोडी लिपीचे संवर्धन करणे. 

3. मोडी लिपीच्या माध्यमातूनविद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधन वृतीवाढीस लावणे. 

4. रोजगाराची संधी प्राप्त करून देणे कार्यप्रणाली :- 

     आजीवन अद्ययन व विस्तार विभाग ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून एक महिना कालावधीचा मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली. या अभ्यासक्रमार्फत विद्यार्थ्यांना बेसिक मोडी लिपीचे ज्ञान देण्यात येऊन शिवाजी विद्यपीठामार्फत परीक्षा घेण्यात येते. सदर मोडी लिपी या अभ्यासक्रमाचे समन्वयकम्हणून डॉ.शिवाजी दत्तात्रय जाधव जबाबदारी पार पाडत आहेत.मोडी लिपीअध्यापणाचे काम इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिखरे, इतिहास संशोधक श्री चंद्रकांत काटे हे करत आहेत.मोडी लिपीच्या अभ्यासक्रमामध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य तसेच महाविद्यालया बाहेरील ज्यांना मोडी लिपी शिकण्याची आवड आहे त्यांनी सहभाग नोंदवला.अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दुर्मिळ मोडी कागदपत्रांचे वाचन, लिपीचा सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांची आवड व शिकण्याची इच्छा यामुळे 2017-18 आणि 2018-19 या कलावधील आभ्यासक्रमाचा निकाल 100% लागला आहे विशेष नोंदी मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमार्फत विद्यार्थ्यांना मोडी लिपीची माहिती करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये 2017-18या कालावधीमध्ये कोल्हापूर राज्याच्या महाराणी जिजाबाईयाच्या काळातील कागदपत्रांचे सकलन करून भित्तीपत्रांच्या माध्यमातून वाचन केले. 2018-19 या कालावधीमध्येकोल्हापूर पुरारभिलेखागरला भेट देऊन तेथील शिवकाळापासून ते शाहूकाळापर्यंत मोडी कागदपत्रांची ओळख करून देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल कागदपत्रांची पाहणी केली. तसेच 2019-20 या कालावधीमध्येगांधी जयंतीचे औचित्या साधून त्यांचे विचार मोडी लिपी मधुन तयार करून भित्तीपत्रांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. या भित्तीपत्रकाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोडी अभ्यासक व मराठा इतिहासाचे संशोधक अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ मधील प्रा. स्टिवर्ट गॉर्डन यांनी मार्गदर्शन केले.

 









No comments:

Post a Comment

Contact

Name

Email *

Message *