इतिहास विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे.

Faculty

 

View Faculty Profile 

1) Dr. S. V. Shikhare 

2) Mr. S. D. Aparadh

3) Dr. S. D. Jadhav





१) डॉ. एस. व्ही. शिखरे:-

            डॉ. शिखरे यांनी कोल्हापूर शहरातील वस्तुसंग्रहालयांचा पर्यटनाच्या दृष्टीकोणातून ऐतिहासिक अभ्यास या विषयावर एम. फील आणि मराठयांच्या आरमारचा इतिहास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. शिखरे यांच्या पीएच. डी. शोधप्रबंधास शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट पीएच. डी. प्रबंध म्हणून कै. सीताबाई कुलकर्णी परितोषिक प्राप्त झाला आहे. डॉ. शिखरे यांचे १० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व १७ शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. ०२ संशोधनपर ग्रंथाचे संपादन, ०३ संशोधनपर ग्रंथाचे सह-संपादन आणि शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. भाग ०१ व बी. ए. भाग साठीच्या ०२  क्रमिक पुस्तकांचे संपादन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या एम. ए. इतिहास विषयाच्या २० विविध घटकांचे आणि बी. ए. इतिहास विषयाच्या ३ घटकांचे लिखाण केलेले आहे. प्रा. श. श्री, पुराणिक लिखित तुळाजी एक विजयदुर्ग या ग्रंथास दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. मराठी विश्वकोशामध्ये १५ नोंदी ऑनलाइन प्रकाशित झाल्या असून १० नोंदींचे ऑनलाइन प्रकाशनाची प्रक्रिया चालू आहे. याशिवाय ०२ विशेषलेख दीपावली अंका मध्ये प्रकाशित झाले आहेत. डॉ. शिखरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ८५ चर्चासत्रे, परिषदामध्ये सहभाग घेत ४२ शोधनिबंधांचे वाचन केले आहे. ४० पेक्षा जास्त विविध विषयावर निमंत्रित व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून कोपेश्वर मंदिर, खिदरपूर हा शोध प्रकल्प (सह-अन्वेषक) पूर्ण केला आहे.

२) प्रा. एस. डी. अपराध:-

            प्रा. अपराध यांनी आजतागायत ५५ विद्यापीठस्तरीय १६ राष्ट्रीय, ०३ आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळामध्ये सहभाग नोंदवला आहे.

३) डॉ. एस. डी. जाधव:-

            डॉ. जाधव यांनी पन्हाळा पर्यटन विकास: एक ऐतिहासिक अभ्यास या विषयावर एम. फील आणि कोल्हापूर जिल्यातील पर्यटन विकास: एक ऐतिहासिक अभ्यास या विषयावर पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. जाधव यांचे २७ शोधनिबंध राष्ट्रीयस्तरावर प्रकाशित झाले आहेत, ३ संशोधनपर ग्रंथाचे संपादन/सह संपादन, १ क्रमिक पुस्तकांचे संपादन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या एम. ए. व बी. ए. च्या अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या ५ घटकांचे लिखाण केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५८ चर्चासत्रे, परिषदामध्ये सहभाग घेत ३२ शोधनिबंधांचे वाचन केले आहे. १० पेक्षा जास्त विविध विषयावर निमंत्रित व्याख्याने दिली आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराच्या विविध किल्ल्यांमध्ये जलसंपत्ती सर्वेक्षण व संवर्धन (सह-अन्वेषक) व पन्हाळा पर्यटन विकास; ऐतिहासिक दृष्टीकोण या शोध प्रकल्पांचे काम चालू आहे.








No comments:

Post a Comment

Contact

Name

Email *

Message *